पोस्ट्स

चांदणे

इमेज
आज खूप दिवसांनी चांदण अलगद खिडकीतून घरात उतरलं... काही निरोप..... सांगावा की गुपित सांगायला आलं कुणास ठाऊक ! ते येणे माझ्यासाठी अनमोल आहे.... दूर असूनही ग्वाही आहे असण्याची.... सोबतीची... आम्ही होतो... असू आणि असेच राहू या आश्वासक अनुभूतीची..... दिवसा सूर्य आणि चंद्र हे दूत आहेत माझ्यासाठी अगदी जवळचे आहेत. त्यांच्यापासून काही लपत नाही.. मी जिथे जाईन तिथे माझ्या सोबत असतात. आपण जेव्हा एकमेकांपासून दूर असू तेव्हा यांना बघत जा कारण मी ही त्यांना तेव्हा बघत असेन... त्यांच्या मार्फत आपण भेटू.  जेव्हा जेव्हा आम्ही दूर असू तेव्हा तेव्हा सूर्य-चंद्र पाहताना कॉल करायचो... गप्पा मारायचो. आता हे होऊ शकत नाही. गप्पा मारणारी माणसं पलीकडे नाही. एक अजून सखा..... सागर.... पयोधी... त्याला पाहिलं की फक्त शांत त्याच्या विशाल..... अमर्यादतेला पाहत पाण्यावरून अलगद चालत चालत क्षितिज गाठावे असे राहून राहून वाटे.  एकदा क्षितिज पाहता पाहता मी समुद्राच्या बरीच आत गेले. दोघांनी मागून येऊन पकडले कुठे? तेव्हा भानावर आले. तेव्हापासून दोघे एका मर्यादेपर्यंतच मला समुद्रात जाऊ देत असत. एकटीला तर न...

प्रेमाची गोष्ट

खरंच प्रेम चौकटीत बसू शकेल का? नक्कीच नाही प्रत्येकाच्या प्रेमाच्या व्याख्या वेगवेगळ्या... आज मागे वळून पाहताना आपल्या नात्याची गुंफण नियतीने किती नकळतपणे गुंफली हे दोघांनाही कळलं नाही. एक मात्र नक्की आपल्याला बऱ्याचदा या नात्याने स्वभावातील वेगवेगळे पैलू दाखवून दिले. लग्नानंतर ही मित्र-मैत्रिणीचं नातं कायम राहिलं.. नवरा बायकोच नातं तर होतं पण मैत्रीचं नातं दृढ होत गेलं. नातं कोणतंही असो त्याला विश्वासाचा पाया मजबूत असावा लागतो. तसा विश्वास आपल्या नात्यात होता म्हणूनच ते कधी तकलादू ठरलं नाही.  उगवणारा प्रत्येक दिवस आठवण घेऊन उगवतो. सूर्याला पाहताना, चंद्राला पाहताना, आपल्या नेहमीच्या रस्त्याने प्रवास करताना क्षणोक्षणी आठवणी हळू हळू धुकं पसरावे तश्या पसरतात. एक गोष्ट मात्र नक्की या धुक्यात बाकी सर्व हरवते पण तुमची छबी मात्र स्पष्ट मूर्त असते. गेल्या पाच वर्षांत खूप काही बदललं असले तरी एक गोष्ट बदलली नाही ती म्हणजे तुमचा हसरा चेहरा.. दुःखात असते तेव्हा उभारी देतो. आनंदात असते तेव्हा प्रेरित करतो. मुळात तुमचा स्वभाव तसाच होता. माझ्या मनात काय चाललं हे न सांगताही कळायचे. एकमेकांच्या नज...

छबी

इमेज
श्वास नवे नवे... आठवणी जुन्या जुन्या...  नव्या - जुन्याचा खेळ  संपता संपेना भेट कधी घडे  हे ही न उलगडे कसं सावरु तुझ्या आठवणीच्या सरीना चिंब होऊनही एक थेंब ओघळतो जसा निखारा लालबुंद..  चटका उरी दाबून राखेची वाट पाहता अजून तिथच थिजलेली, मी एकाकी.... वचन दिले दूर असू तेव्हा सूर्य चंद्र तारे,आकाश,सागर यांच्या नजरेने भेटू...  आज ती नजर भिरभिरे सागरकिनारी, आकाशात, चंद्र - तारकांत,सूर्योदय सूर्यास्तात !  कुठे गवसेना अस्तिव....  होते भास वास्तवाचे....  रिते मन, रिते घर, रिते अंगण. सुने सुने तुझ्यावाचून सारे क्षण... हे क्षण वेचताना, हृदय साक्ष देई... जोवर असेन मी ......असेल त्याची छबी माझ्यासवे ......

वेड

इमेज
 प्रिय दुष्ट (प्री... फ्रूट अँड नट) मंद वाऱ्याची झुळूक यावी....अवचित पावसाची सर यावी तशी तुझी आमच्या आयुष्यात आलीस. खरं तर त्यावेळी आम्ही दोघंही एका वेगळ्याच फेऱ्यात अडकलो होतो. पल्लू आमच्यापासून दुरावली होती, त्यात अनेक उपचार करूनही आमचे इप्सित साध्य होत नव्हते. शरीराने-मनाने दोघेही थकलो होतो. सर्वांसाठी चेहऱ्यावर हसरा मुखवटा धारण केलेला... मुखवट्यामागे आर्त वेदना जी फक्त आमच्याही नकळत आम्ही दाबलेली... अश्या काळात तू अवतरलीस आमची कन्या म्हणून.. माझी दुष्ट... यांची बेटा...! तुझे मम्मा म्हणणे माझ्यातल्या आईला सुखावणारे होते. यांच्याशी प्रत्येक कामात सल्ला- मसलत,चर्चा व्हायच्या... गावी जाण्यापासून ते गुंतवणुकीपर्यंत ...! तू जेव्हा जेव्हा अंधेरीच्या घरी यायचीस तेव्हा तेव्हा निघताना तुला नेहमी आम्ही थांबवावे असे वाटे..पण नाही थांबवायचो... तू तुझ्या काळाचौकीच्या घरी जावीस इथे गुंतू नयेस असे वाटायचे. तुझ्या घरच्यापासून तोडणे आम्हाला नको होते. आम्ही खूप प्रयत्न केले की तू आमच्यापासून दूर व्हावीस.. पण जितके आम्ही तुला तुझ्या पालकांकडे ढकलत होतो तेवढीच तू आमच्याकडे ओ...

सिकंदर

"वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है हारी बाज़ी को जीतना जिसे आता है.." प्रत्येक जण 31डिसेंबरला आपला लेखा-जोखा मांडत असतो. कधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळी व्यावहारिक पातळीवरची गणिते. जीवनाचा अर्थ जो तो आपापल्या परीने लावतो. जगण्याचा अर्थ स्वतःचा स्वतः कधी लावणार?  खर तर यावर्षी जानेवारी महिन्यातील माझे हॉस्पिटलला ऍडमिट होणे माझ्या स्वतःच्या तब्बेतीबाबत केलेले दुर्लक्ष आणि हेळसांड हेच होते. अतिप्रमाणात perfectionist बनण्याचा प्रयत्न... या दिवसात माझे मला कळले की मला थोड थोड स्वतःला बदलवावे लागेल. सुरुवात करण भाग होत.k एकदम बदल होणे शक्य नाही... क्रांती की परिवर्तन??? हळूहळू बदल करणे स्वीकारले. वर्षभरात गणपतीत गावी एके गावी हे समीकरण चुकवले.... जुनागढ गिरनार दर्शन, सोमनाथ, देवगड, लोणावळा, नवदेवीदर्शन (सप्तदेवीच झाल्या), दापोली या ना त्या निमित्ताने फिरणं झाले. चारचौघी कमाल नाटक.... पाहण्याचा योग आला. स्त्रीची नानविध असण्याची वृत्ती तिला ठाम आणि कणखर बनविण्यास मदत करते. कित्येकदा तिची द्विधा अवस्था होते... कित्येकदा हतबल होते. पण तेवढीच ती सपक निर्णय घेऊन मोकळीही होते. आपल्य...

अबोली....(सरतं... वर्ष...)

इमेज
मना-मनात आनंदोत्सव नववर्षाचा रुंजी घालतोय ! सरत्या वर्षाला निरोप देताना भरून तर येतयं.... मागे वळून पाहताना   झरझर सरकू लागला  तिचा गतकाळ.... ३१ डिसेंबर किंवा १ जानेवरी कधी साजरे केल्याचे तिला आठवावे लागले. लहानपणी टि.व्ही. समोर बसून पाहिलेला 'गजरा'! काॅलेजमधील आयुष्यात जिवलग मैत्रीणीसोबत घालविलेली जूहू किनाऱ्यावरिल ३१ डिसेंबरची संध्याकाळ ! १जानेवारीला पार्लेश्वर मंदिरातील श्री शंभो, आणि श्रीगणेशाचे दर्शन! किती सुंदर होते ते दिन !  लग्नानंतर चित्र थोडे बदलले. त्याला मित्र परिवार भरपूर त्यामुळे त्याचे मित्रांसाठी ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन ! लग्नाआधी या सर्व गोष्टींची कल्पना असल्याने तीने लग्नाच्या पहिल्या वर्षी सन१९९९ डिसेंबर ३१ तारखेला त्याला पत्र लिहिले आणि ते पत्र हळूच त्याच्या बॅगेत ठेवले आणि रात्री १२ वाजता New year चा काॅल विश करण्यासाठी आल्यावर तिने ते पत्र त्याला वाचायला सांगितले... त्यानंतर दरवर्षी पत्राचा सिलसिला सुरू झाला. पण आज पत्र वाचणारा चोरपावलांनी निघून गेला...  जीवलगा ..... या क्षणाला मी पत्र लिहिते आहे. पत्र वाचायला तुला खूप आवडायचे न...

अबोली

इमेज
सकाळी  कपातील चहाचा एकेक घोट घेता-घेता मनात आठवणींचे काहूर माजले. लाॅकडाऊनचे हे दिवस त्यांच्यासाठी उपकारच होते. मस्त गप्पा मारत दोघं एकत्र चहा पित बसायचे.  एरवी तिच्या सकाळच्या अधिवेशनामुळे दोघांना एकत्र चहा घेता येत नसें...आणि रविवार आठवड्याची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची तिची धावपळ...  रविवारचीच नाही एरवीही तिची नेहमीच धावपळ !! कधीतरी बसून चहा पित जा ग..!  स्वत:ला थोडा वेळ दे तो नेहमीच तिला प्रेमाने तर कधी चिडून सांगायचा....  तेव्हा ती नेहमीच एक छानस हसून निरूत्तर करायची.  त्याची तिच्याबद्दल एकच तक्रार होती ती म्हणजे स्वत:कड़े लक्ष देत नाही आराम करत नाही. आज शांत बसून चहा घेतना हे सर्व आठवून तिच्या डोळ्यांत पाणी तराळले..... मी आहे ना ! असे शब्द  कानी कुजबूजले. लगेच अश्रू थिजले आणि मंद स्मित करून तिने त्याच्या फोटोकडे पाहिले...फोटोतही तेच आश्वस्त हसू !  तसे दोघही  अबोल,भीडस्त ...  त्यांची पटकन कोणाशी मैत्री होत नसे. एकमेकांना लहानपणापासून ओळखत असूनही त्या दोघांची मैत्री उशिराच झाली. मैत्रीचे प्रेमात आणि प्रेमाचे लग्नात  र...