स्वयंसिद्धा
नवरात्र हा शक्तिचा उत्सव..! कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ति प्राप्त होती नाही. या पृथ्वीतलावर स्त्री-नारी किंवा मादा ही देवीचा अंश आहे. लहानपणी आम्ही शेजारी-पाजारी 'कुमारिका' म्हणून जेवायला जायचो... काय थाट असायचा आमचा !! काय मान-सम्मान मिळायचा ! त्याक्षणी आम्ही देवीस्वरूपच !! आमच्या १० जणींबरोबर एकच मुलगा बटुक म्ह़णून असायचा.. आमची यथासांग पूजा केल्यावर सुग्रास मिष्टान्न नेवैद्याचे ताट वाढले जाई...तेव्हा अल्लडवयात आम्हांला याचे खूप अप्रूप होते. साधारण २ ते १० वर्षांपर्यंत मुलींची पुजा करण्याचा प्रघात आहे.या मुलींना साक्षात् देवी मानून त्यांना 'कुमारिका' म्हणतात. या कुमारिकांचे पूजन करून जेवायला घालण्याची प्रथा आहे. या कन्यांची रूपे २ वर्षाची कन्या - कुमारीका ३ वर्षाची कन्या - त्रिमूर्ति ४ वर्षाची कन्या - कल्याणी ५ वर्षाची कन्या - रोहिणी ६ वर्षाची कन्या - कालिका ७ वर्षाची कन्या - चंडिका ८ वर्षाची कन्या- शांभवी ९ वर्षाची कन्या - दुर्गा १० वर्षाची कन्या- सुभद्रा अशी आहेत... लग्नानंतर हिच कन्या सवाष्ण होते. खणा-नारळाने तिची ओटी भरली जाते...