पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परिवर्तन

'परिवर्तन'..... हा निसर्गाचा नियम.....परिवर्तनाचे उत्सव होणे हे पर्यायाने आलेच !  निसर्ग हे उत्सव आपल्या मनासारखे साजरे करतोय...!! आनंद भरभरून देतोय कुठेही गाजावाजा नाही कुठेही आतताईपणा नाही निमूटपणे.....हळूवार आपल्या बदलांचे उत्सव साजरे करतो... मग तो सूर्योदय असो वा सूर्यास्त, पिवळया फुलांनी डवरलेला गुलमोहर असो वा निष्पर्ण झालेला पिंपळराज असो,डोंगरकड्यावरून कोसळणारा जलप्रपात असो वा झुळझुळ वाहणारा निर्झर...!!  आपण मानवजात या निसर्गाच्या जीवावर का उठलोय??? निसर्ग आपणास भरभरून देतोय आणि आपण तेच नष्ट करण्याच्या मागे लागलोय... आपले  प्रत्येक सण हे नैसर्गिक घटकांशी निगडीत आहेत... हिंदू संस्कृतीने मानवाला पर्यावरणाशी एकरूप केले आहे...त्याला वैज्ञानिक दृष्टिकोण बहाल केला आहे... मग तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक !!! आपल्याला हे मान्य करावेच लागेल !!!!! पौराणिक कथा वाचताना लक्षात येते कि पूर्वी लोकांची देवी-देवतांवर नितांत श्रद्धा होती.. त्याचाच आधार घेत त्यांनी काही गोष्टी धर्माच्या नावाखाली रूजविल्या...  आजच्या काळात त्या वैज्ञानिक दृष्टिकोण ठेऊन त्या मांडल्या जाणे आवश्यक आहे...