परिवर्तन
'परिवर्तन'..... हा निसर्गाचा नियम.....परिवर्तनाचे उत्सव होणे हे पर्यायाने आलेच !
निसर्ग हे उत्सव आपल्या मनासारखे साजरे करतोय...!! आनंद भरभरून देतोय कुठेही गाजावाजा नाही कुठेही आतताईपणा नाही निमूटपणे.....हळूवार आपल्या बदलांचे उत्सव साजरे करतो... मग तो सूर्योदय असो वा सूर्यास्त, पिवळया फुलांनी डवरलेला गुलमोहर असो वा निष्पर्ण झालेला पिंपळराज असो,डोंगरकड्यावरून कोसळणारा जलप्रपात असो वा झुळझुळ वाहणारा निर्झर...!!
आपण मानवजात या निसर्गाच्या जीवावर का उठलोय??? निसर्ग आपणास भरभरून देतोय आणि आपण तेच नष्ट करण्याच्या मागे लागलोय...
आपले प्रत्येक सण हे नैसर्गिक घटकांशी निगडीत आहेत... हिंदू संस्कृतीने मानवाला पर्यावरणाशी एकरूप केले आहे...त्याला वैज्ञानिक दृष्टिकोण बहाल केला आहे... मग तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक !!!
आपल्याला हे मान्य करावेच लागेल !!!!!
पौराणिक कथा वाचताना लक्षात येते कि पूर्वी लोकांची देवी-देवतांवर नितांत श्रद्धा होती.. त्याचाच आधार घेत त्यांनी काही गोष्टी धर्माच्या नावाखाली रूजविल्या...
आजच्या काळात त्या वैज्ञानिक दृष्टिकोण ठेऊन त्या मांडल्या जाणे आवश्यक आहे. तो काळ आणि आताचा काळ यात जमिन- आसमानाचा फरक आहे.. तेव्हाच्या चालीरिती आज व्हायलाच हव्या असा अट्टाहासही नको...
जगात एकमेव भारत असा देश आहे जिथे प्राकृतिक सौंदर्याची उधळण आहे, जिथे विविध जाति- धर्म -पंथ एकोप्याने नांदताहेत.. इथला हर एक सण - उत्सव जगाला आकर्षित करतो.. मग तो गणेशोत्सव असो.. गोकुळाष्टमी असो..दिवाळी असो.... किंवा होळी असो..
असं असतानाही काही वेळा आपण कमनशिबी ठरतो जेव्हा कुणाच्याही बहकाव्याने धार्मिक तेढ निर्माण करणार्याच्यां हातातील बाहुले बनतो... मूळ उद्देश बाजूला सारून धार्मिक, प्रांतीय,जातीय वादाच्या ठिणग्यांना फुंकर घालू लागतो... मानवतावाद विझून जातो..
भारताची प्रतिज्ञा- 'भारत माझा देश आहे.' याने सुरू होते. 'माझा' या शब्दात स्वत:ची वैयक्तिक जबाबरी येते. जेव्हा आपण एखादी वस्तू आपली म्हटल्यावर त्यावर सार्वभौमत्व अभिप्रेत घेतो पण तेच माझं म्हणताना आपण आपली मालकी दाखवतो. ती वस्तू जपून हाताळतो,तिची काळजी घेतो..! तशीच काळजी देशाची नको का घ्यायला???
लाॅकडाउनच्या काळात एकंदरित सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली. सर्वच जण मनातल्या मनात व घरातील देवघरातल्या देवांना साकडे चालू लागलो... ईश्वरीय शक्ती
सण- समारंभ- उत्सव आनंदाचे एकोप्याचे स्नेहाचे द्योतक होणे गरजेचे आहे... इथे दिखावा,अहंभाव,गर्व नको हवे फक्त प्रेम,आपुलकी,बांधिलकीचे...... मर्मबंध...!
🙏🙏👌👌👌
उत्तर द्याहटवाVery nice ...we r the new Generation of India ...we have to definitely follow प्रेम आपुलकी,बांधिलकीचे...... मर्मबंध..
बदल... परिवर्तन हवे पण दिखाऊपणा नको.... कुठेच
हटवा