अबोली
सकाळी कपातील चहाचा एकेक घोट घेता-घेता मनात आठवणींचे काहूर माजले. लाॅकडाऊनचे हे दिवस त्यांच्यासाठी उपकारच होते. मस्त गप्पा मारत दोघं एकत्र चहा पित बसायचे. एरवी तिच्या सकाळच्या अधिवेशनामुळे दोघांना एकत्र चहा घेता येत नसें...आणि रविवार आठवड्याची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची तिची धावपळ... रविवारचीच नाही एरवीही तिची नेहमीच धावपळ !! कधीतरी बसून चहा पित जा ग..! स्वत:ला थोडा वेळ दे तो नेहमीच तिला प्रेमाने तर कधी चिडून सांगायचा....
तेव्हा ती नेहमीच एक छानस हसून निरूत्तर करायची. त्याची तिच्याबद्दल एकच तक्रार होती ती म्हणजे स्वत:कड़े लक्ष देत नाही आराम करत नाही.
आज शांत बसून चहा घेतना हे सर्व आठवून तिच्या डोळ्यांत पाणी तराळले..... मी आहे ना ! असे शब्द कानी कुजबूजले. लगेच अश्रू थिजले आणि मंद स्मित करून तिने त्याच्या फोटोकडे पाहिले...फोटोतही तेच आश्वस्त हसू !
तसे दोघही अबोल,भीडस्त ... त्यांची पटकन कोणाशी मैत्री होत नसे. एकमेकांना लहानपणापासून ओळखत असूनही त्या दोघांची मैत्री उशिराच झाली. मैत्रीचे प्रेमात आणि प्रेमाचे लग्नात रूपांतरही उशिराच घडले. मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठीही बराच अवधी लागला. लग्नानंतर सर्वांना असेच वाटायचे कि यांचे लहानपणापासून प्रेम होते.. खरी गोम फक्त त्या दोघानांच माहित होती!!!
'दो जिस्म... एक जान है हम...' याप्रकारचे त्यांचे प्रेम !!! आजही त्याच प्रेमाच्या जोरावर ती त्याच्या प्रेमाच्या अमृताने पूर्ण शक्तीने हसतमुख उभी आहे. तसाच तोही तिच्या पाठीशी हसतमुख उभा आहे.
प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना शब्दांचाच आधार लागायाचाच असे नाही.... दोघं नजरेने बोलायचे. एकमेकांच्या मनात काय चाललयं हे ओळखायला एकमेकांचे डोळे माध्यम होते. मनानं एकरूप असलेले हे जोडपे हेवा वाटण्यासारखेच होते.
तिला त्याच्याबद्दल खूप अभिमान होता... त्याला ही तिच्याबद्दल अभिमान होता तिच्यापेक्षा त्याला तिचा अभिमान कैकपटीने जास्त होता .....
खरंतर दोघांनीही एकमेकांचे बालपण जवळून पाहिलेले...पण त्यांच्यात मित्र-मैत्रिणीचे नात नव्हतं !
तिच्यासाठी त्याची ओळख होती... मामाशेजारी राहणारा मुलगा.. हे आता जरी आठवले तरी तिला स्वत:चच हसू येतं .... तिला जर कुणी हा तुझा होणारा नवरा असं भविष्य सांगीतलं असतं तर विश्वासच नसता ठेवला !
तो तिला कायम खडूस, हेकेखोर वाटायचा.. साधारण बी.एड. करताना तीची आणि त्याची मैत्री झाली..तो नेहमी हातचं राखून बोलतोय असं तिला वाटे.. ही तशी मितभाषी त्यामुळे गप्पा होत नव्हत्या.. पण हिच्या आईशी मात्र तो दिलखुलास गप्पा मारी... ट्युशनमुळे तिला यांच्या गप्पांचे सोयरसुतकंही नव्हते.... याला आपल्या घरातील गोष्टी कशाला सांगतेस ? तो काय आपल्या नातेवाईंकापैकी थोडाच आहे?.... असं ती आपल्या आईला ऐकवी... पुढे-पुढे असं सांगणंही तिने बंद केले कारण... बोलून काही उपयोगच नव्हता... काॅलेज, टायपिंग- शाॅर्टहॅन्ड क्लास, मुलांच्या ट्युशन यांत तिला रात्रीचे ९.३० वाजत... इतर वायफळ गोष्टिंकडे लक्ष द्यायला वेळही नव्हता... लग्नाचा विचार तर दूरचीच गोष्ट...
तुझ्या लग्नात मला फोटो काढायला बोलव हं... नाही तर विसरशील असं म्हणाला होता तिला.... तिनंही ते कबूल केले होते.. एकमेकांशी लग्न झाल्यावर ती या गोष्टीवरून चिडवी.. पुण्यवचन करताना मात्र त्याने तिचा एक फोटो कॅमेराबंद केला आणि दिलेला शब्द पाळला.!
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा