चांदणे
आज खूप दिवसांनी चांदण अलगद खिडकीतून घरात उतरलं... काही निरोप..... सांगावा की गुपित सांगायला आलं कुणास ठाऊक ! ते येणे माझ्यासाठी अनमोल आहे.... दूर असूनही ग्वाही आहे असण्याची.... सोबतीची... आम्ही होतो... असू आणि असेच राहू या आश्वासक अनुभूतीची.....
दिवसा सूर्य आणि चंद्र हे दूत आहेत माझ्यासाठी अगदी जवळचे आहेत. त्यांच्यापासून काही लपत नाही.. मी जिथे जाईन तिथे माझ्या सोबत असतात.
आपण जेव्हा एकमेकांपासून दूर असू तेव्हा यांना बघत जा कारण मी ही त्यांना तेव्हा बघत असेन... त्यांच्या मार्फत आपण भेटू.
जेव्हा जेव्हा आम्ही दूर असू तेव्हा तेव्हा सूर्य-चंद्र पाहताना कॉल करायचो... गप्पा मारायचो. आता हे होऊ शकत नाही. गप्पा मारणारी माणसं पलीकडे नाही.
एक अजून सखा..... सागर.... पयोधी... त्याला पाहिलं की फक्त शांत त्याच्या विशाल..... अमर्यादतेला पाहत पाण्यावरून अलगद चालत चालत क्षितिज गाठावे असे राहून राहून वाटे. एकदा क्षितिज पाहता पाहता मी समुद्राच्या बरीच आत गेले. दोघांनी मागून येऊन पकडले कुठे? तेव्हा भानावर आले. तेव्हापासून दोघे एका मर्यादेपर्यंतच मला समुद्रात जाऊ देत असत. एकटीला तर नाहीच नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा