छबी

श्वास नवे नवे...
आठवणी जुन्या जुन्या...
 नव्या - जुन्याचा खेळ 
संपता संपेना
भेट कधी घडे 
हे ही न उलगडे
कसं सावरु तुझ्या आठवणीच्या सरीना
चिंब होऊनही एक थेंब ओघळतो जसा निखारा लालबुंद..
 चटका उरी दाबून राखेची वाट पाहता अजून तिथच थिजलेली,
मी एकाकी....
वचन दिले दूर असू तेव्हा सूर्य चंद्र तारे,आकाश,सागर यांच्या नजरेने भेटू... 
आज ती नजर भिरभिरे सागरकिनारी, आकाशात, चंद्र - तारकांत,सूर्योदय सूर्यास्तात ! 
कुठे गवसेना अस्तिव....
 होते भास वास्तवाचे.... 
रिते मन, रिते घर, रिते अंगण.
सुने सुने तुझ्यावाचून सारे क्षण...
हे क्षण वेचताना, हृदय साक्ष देई...
जोवर असेन मी ......असेल त्याची छबी माझ्यासवे ......

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेड

आये ऽऽऽऽऽ

प्रेमाची गोष्ट