स्वयंसिद्धा

नवरात्र हा शक्तिचा उत्सव..!

कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ति प्राप्त होती नाही. या पृथ्वीतलावर स्त्री-नारी किंवा मादा ही देवीचा अंश आहे.
लहानपणी आम्ही शेजारी-पाजारी 'कुमारिका' म्हणून जेवायला जायचो... काय थाट असायचा आमचा !! काय मान-सम्मान मिळायचा ! त्याक्षणी आम्ही देवीस्वरूपच !!
आमच्या १० जणींबरोबर एकच मुलगा बटुक म्ह़णून असायचा.. आमची यथासांग पूजा केल्यावर सुग्रास मिष्टान्न नेवैद्याचे ताट वाढले जाई...तेव्हा अल्लडवयात आम्हांला याचे खूप अप्रूप होते.
साधारण  २ ते १० वर्षांपर्यंत मुलींची पुजा करण्याचा प्रघात आहे.या मुलींना साक्षात् देवी मानून त्यांना 'कुमारिका'  म्हणतात. या कुमारिकांचे पूजन करून जेवायला घालण्याची प्रथा आहे. या कन्यांची रूपे
२ वर्षाची कन्या - कुमारीका
३ वर्षाची कन्या - त्रिमूर्ति
४ वर्षाची कन्या - कल्याणी
५ वर्षाची कन्या - रोहिणी
६ वर्षाची कन्या - कालिका
७ वर्षाची कन्या - चंडिका
८ वर्षाची कन्या- शांभवी
९ वर्षाची कन्या - दुर्गा
१० वर्षाची कन्या- सुभद्रा
अशी आहेत... 
लग्नानंतर हिच कन्या सवाष्ण होते.  खणा-नारळाने तिची ओटी भरली जाते... 'अखंड सौभाग्यवती भव!' ... असा आशीर्वाद दिला जातो.. स्वत:ला किती भाग्यवान समझते  ती !!!
पण याच स्त्रीची पतिमृत्यूनंतर शेवटची ओटी भरली जाते ती स्वत:ला दुर्भागी समजू लागते.. सौभाग्याची एक- एक आभूषणे उतरवली जाऊ लागतात...किती मरणप्राय यातना त्या...आधिच तिचा साथिदार तिने गमावलेला असतो आणि त्यात  लग्नवेदीवर येताना घातलेली हिरवी कंकणे,त्याने बांधलेला मुहूर्तमणी,मंगळसूत्र, कुंकू, जोडवी, हे सर्व काढली जातात...का??? 
लग्नाआधी मिला कुमारिका म्हणून पूजिले जाते
जिला हळदकुंकू लावून मानाने वागविले जायचे आता तिला ते लावलही जात नाही. 
तिच्यातील देवीस्वरूप शक्ति नाहिशी झाली का?? 
बर अशा या स्त्रिया आपल शील निष्कलंक ठेऊन किती खंबीरपणे उभ्या राहतात,अतोनात कष्ट उपसतात आपल्या कुटुंबासाठी,मुलांसाठी ... !!
 ही लढाई त्या एकट्याच्या हिंमतीवर लढतात... तेव्हा त्यांच्यातील या शक्तिला का पूजलं जात नाही?? 
अरे... देवीला कुंकुमार्चन,तिची ओटी भरणे या गोष्टींतून ती स्वत:ला अलिप्त ठेऊ लागते??? 
का??? 
कश्यासाठी???
मला अस वाटतं कि जिला स्वत:ला अस वाटत कि मला देवीची ओटी भरायची आहे तिने ती जरूर भरावी पण जर समाज काय म्हणेल यांचा विचार करून जर ती हे करत नसेल तर ती स्वत:त असलेल्या दैवीय शक्तिचा अपमान करतेय...!
समाज हळूहळू बदलतोय... आणि त्याने जरूर बदलायला हवं... कारण जसं साचलेल पाणी कालांतराने दूषित होतं तसं विचारांचे होते....
कालपरत्वे वैचारिक बदल होणे अपेक्षित आहे.
माता जिजाऊच्या लेकी, राणी येसूबाई, राणी लक्ष्मीबाईच्या आपण सख्या आहोत मग आपल आपणच स्वत:ला सिद्ध करून 'स्वयंसिद्धा' व्हावे....!



टिप्पण्या

  1. Jay bhavai....

    Khup sunder...
    Mala ase watate hey saglya stree vargacha manatale udgar aahet,
    te tumacha lekhanitun aaj rekhatle gele aahet.....
    Pratek manushala swatantra aahe je tyala watate te karnyacha.

    Ani aai bhavani🙏 , mumbadevi 🙏, Mahalaxmi🙏 tumhala utaroutar bal devo ani sadaiva tumacha pathishi unhi raho hich prathana. 🙏
    🚩Jagdamb🚩


    उत्तर द्याहटवा
  2. मस्त लिहिलं आहेस. मी खरं तर आता पूर्ण नास्तिक आहे. काही हिंदू प्रथा मला खूप आधीपासूनच आवडत नाहीत त्यातील एक खूप वाईट प्रथा खूप मार्मिक पणे मांडली आहेस.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो...खर आहे.. स्त्रीने स्वत:च्या इच्छेने केले तर ठीक... कोणी ते जबरदस्तीने करण्यास भाग पाडू नये...

      हटवा
  3. हो नक्कीच!आपण सर्वांनी आपली विचारसरणी बदलली पाहिजे तरच बदल होईल.ह्या blog द्वरे तुम्ही खूप मोलाचा संदेश पोचवल्यवद्दल धन्यवाद!!👍👍

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान. परंपरा रीतीरिवाज व मानवी मनातील भावना फार सुंदर रीतीने मांडल्या आहेत.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेड

आये ऽऽऽऽऽ

प्रेमाची गोष्ट