स्कंदमाता
नवदु्र्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता'...
बुद्धिमत्ता आणि ज्ञानाची देवी!
भगवान शिव- पार्वतीचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय-स्कंद !
ज्ञानशक्ती आणि कर्मशक्ती सूचक नाव- स्कंद !
जी दैवीय शक्ती आहे जी व्यवहारिक ज्ञानाला समोर आणते आणि जे ज्ञान आहे त्याला कर्मात बदलते ती.... 'स्कंदमाता' !
शिवतत्व आनंदमय, सदैव शांत,आणि कोणत्याही प्रकारचे कर्माच्या पूर्णत्वाचे सुंदर रूप !
'सत्यं.. शिवम् ..सुंदरम् !'
देवी... इच्छाशक्ती,ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती यांचा संयोग आहे आणि जेव्हा शिवतत्वाचे मिलन या त्रिशक्तींबरोबर होते तेव्हा 'स्कंद' जन्म होतो.
स्कंदमाता ज्ञान आणि क्रिया यांचा स्रोत ..... आरंभाचे प्रतीक आहे.
एखादे संकट आल्यावर आपण काय करतो? कोणत्या ज्ञानाचा उपयोग करतो? त्या संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला क्रियात्मक व्हावेच लागते..जेव्हा आपले कर्म व्यावहारिक ज्ञानापासून अलिप्त रहाते तेव्हा स्कंद तत्वाचा उदय होतो. देवी याच तत्वाची माता म्हणून तिचे हे रूप 'स्कंदमाता' !
आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक संकटे आपली परीक्षा घेत असतात. त्या संकटांवर मात करण्यासाठी कोणतच पुस्तक,गाईड उपलब्ध नाही, व्यवहारिक ज्ञानही उपयोगात आणता येत नाही... अश्यावेळी शांत विचार करून... प्राप्त ज्ञानाच्या आधारे सारासार विचार करून कृतीच करावी लागते...
कृतीशील रहावे लागते. ही कृतीच आपणास विजयश्री मिळवून देते.
देवीच्या या तत्वाचा अंगीकार करून तिची उपासना करणं हेच आपलं कर्तव्य...
हिच आपली पूजा....
हिच आराधना.... !
।। ॐ देवी स्कंदमाताय नमः ।।
Wahhhhhhhh...... Chan lihile aahe... Knowledgeable.......
उत्तर द्याहटवाKhupach chan lihites Tai
हटवा🙏 धन्यवाद!!!
हटवा