शक्ति

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।


आज १७ ऑक्टोबर २०२० शारदीय नवरात्र प्रारंभ.. घटस्थापनेने केला.
पहिला दिवस आई दुर्गेचे शैलपुत्री रूप... 
गीरिराज हिमालयाची पुत्री असल्याने शैलपुत्री हे नाव धारण केले. 
पौराणिक कथांनुसार पूर्वजन्मी प्रजापती दक्षाची पुत्री ..
सती !  
देवांचे देव महादेवाशी विवाह संपन्न. दक्षाला अमान्य होते पण पुत्रीच्या प्रेमापोटी स्वीकार केला. दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात सतीला व महादेवांना आमंत्रण नव्हते...त्यामुळे तिथे जाणे अयोग्य असे सांगूनही सतीने भगवान शंकराचे ऐकले नाही. सती तिथे एकटीच जाते पण आपल्या पित्यानेच केलेल्या पतीच्या अपमाने क्रोधित होऊन यज्ञकुंडात स्वप्राणाची आहुती देते. भगवान शिवाला हे कळल्यावर ते क्रोधायमान होऊन त्याठिकाणी येतात ... सतीचे पार्थिव शरीर घेऊन भ्रमण करतात. तिच्या विरहाने  विदग्ध होतात... कसलेच भान त्यांना नव्हते. त्यांचे तांडव हाहाकार माजवत होते.त्यांना भानावर आणण्यासाठी सतीचे शरीर नष्ट होणे गरजेचे होते. भगवान विष्णूनीं सुदर्शनाने एक एक भाग विलग केले. तिच्या शरिराचे जिथे जिथे हे भाग विखुरले गेले तिथे तिथे शक्तिपीठे झाली.

शंभो .... 
जिथे तुला तुझ्या प्रिय सतिचा विरह नाही सहन झाला.... 
तिथे मी तुझ्याकडे फर्याद काय मांडू??.... 
तू तुझे दु:ख पचविलेस तसे पचविण्याचे धैर्य मात्र जरूर दें....
स्त्रियांना उपजत दु:ख पचविण्याची ताकद देतोस हे नाकारातही नाही...
एकटी स्त्री आपल्या नानाविध नात्यांची घट्ट वीण विणते.
मग ती आजी असो....आई असो.....मुलगी असो....पत्नी असो..... वहिनी असो......मामी-काकी असो.....प्रत्येक नात्यात प्रेमाचा,मायेचा,वात्सल्याचा निरंतर झरा पाझरत असतो.
अन्नपूर्णा, गृहलक्ष्मी, सरस्वती,चंडिका, महाकाली .....
प्रत्येक घरात हिची ही विविध रूपे आपल्या कुटुंबाचे संरक्षण करताना आढळतात. तिचे अस्तित्वच घराला घरपण देतं.. मायेचा वर्षाव करताना ती जितकी कोमल तितकीच संकटाशी
 सामना करताना ती  कणखर होते.
पुरूष आणि स्त्री रूपी गुण तिच्या ठायी आढळतात...त्यामुळेच ती वंदिली जाते.

शिवशक्ति एकमेकांस पूरक आहेत... 
एकाकार आहेत.... 
शिव हिच शक्ति आणि शक्ति हिच शिव !!
नश्वर शरीर असते..... 
आत्मा नाही..!


टिप्पण्या

  1. Khup chan lihile aahe. Aasech lihit raha ani prakashit karat raha. Waiting for next Blog......

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेड

आये ऽऽऽऽऽ

प्रेमाची गोष्ट